Turmeric Water

Turmeric Water : झोपून उठताच सकाळी एक ग्लास हळदीचे कोमट पाणी पिल्यामुळे ‘या’ समस्या होतील दूर

570 0

पावसाळ्याच्या महिन्यांमध्ये आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. अनेकदा पाण्याच्या माध्यमातूनच (Turmeric Water) शरीरात जंतू, विषाणू प्रवेश करतात. तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीनुसार या विषाणूंना लढा दिला जातो पण काही वेळा या विषाणूंची शक्ती अधिक ठरते आणि परिणामी आपण आजारी पडता. आज आपण पाणी पिऊनच शरीराला सुदृढ कसे ठेवता येईल याबद्दल जाणून घेणार आहोत.

शरीर आजारमुक्त ठेवण्याचा एक मार्ग म्हणजे डिटॉक्स. आपल्या शरीरातील जंतू- विषाणूच नव्हे तर काही अनावश्यक घटक सुद्धा तसेच पडून राहिल्याने यातून नुकसान होऊ शकते. हे घटक मलमूत्र विसर्जनातून बाहेर टाकण्यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातील एक उपाय म्हणजे हळदीचे पाणी. भारतीय मसाल्यांमधील मुख्य भाग अशी ओळख असलेल्या हळदीला जागतिक स्तरावर औषधी वनस्पतीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. चला तर मग जाणून घेऊया हळदीचे कोमट पाणी (Turmeric Water) पिल्यामुळे काय फायदा होतो ते…

हळदीमुळे शरीराला बाह्य जखम देखील लवकर भरण्यासही मदत होते.
हळदीचे पाणी प्यायल्यास स्नायूंना मजबुती मिळते. ज्यामुळे सांधेदुखी आणि आर्थरायटिस यासारख्या आजारांचा धोका कमी होतो.
हळदीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि किडनीसाठी पोषक असणारे औषधी गुणधर्म असतात. यामुळे किडनी स्टोनसारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो.
हळदीमध्ये (Turmeric Water) लिपोपोलीसॅचिरिड असल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते. परिणामी ताप, सर्दी आणि खोकल्याचा त्रास कमी होतो.
हळदीतील पोषण तत्त्वांमुळे खराब कोलेस्ट्रॉल देखील कमी होते.
हळदीतील अँटी-ऑक्सिडेंटचे गुणधर्म नैराश्य कमी करण्यास मदत करतात.
मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांवर सुद्धा हळदीचे पाणी आरामदायक ठरू शकते.
वजन कमी करू इच्छित असाल तर हळदीच्या पाण्याची नक्कीच मदत होईल. हळदीत असणाऱ्या कर्क्युमिनमुळे अतिरिक्त फॅट्स कमी होतात.
आपल्याकडे हळदीचे दूध आजारांपासून मुक्त करते असं म्हणतात पण तरी ज्यांना दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी आहे त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
हळद कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने पचन प्रक्रियेला वेग मिळतो.

(वरील सर्व माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आम्ही याला कोणताही दुजोरा देत नाही. वरील कोणताही उपाय करण्याच्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide