HEALTH : टॉयलेटमध्ये मोबाईल घेऊन तासभर बसता का ? जरा ही बातमी वाचाच, होऊ शकतात हे गंभीर परिणाम

869 0

HEALTH : आज-काल मोबाईलचा वेड इतकं लागला आहे की अनेक जणांना टॉयलेटमध्ये जाताना मोबाईल घेऊन जाण्याची सवय असते. तुम्ही देखील यांपैकी एक असाल तर ही बातमी पूर्ण वाचा…

टॉयलेटला जाताना मोबाईल घेऊन तासंतास बसत असाल तर मोबाईलच्या स्क्रीन कडे बघून तुमचा शरीर मात्र अनेक आजारांना आमंत्रण देत असत.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे जास्त वेळ टॉयलेट सीटवर बसल्यामुळे पाठीच्या आणि पोटाच्या खालच्या बाजूला असणाऱ्या स्नायूंवर दाब येतो. यामुळे मूळव्याध होण्याची दाट शक्यता असते . घरातील जेष्ठ लोक यावरून बऱ्याच वेळा सल्ला देखील देत असतात . तर हा सल्ला बरोबर आहे. हलक्यात घेऊ नका, कारण मूळव्याध तुम्हाला खूप वेदना देऊ शकते.

अधिक वेळ टॉयलेट सीटवर बसल्यामुळे बद्धकोष्ठता, पोट नीट साफ न होणे हा देखील त्रास उद्भवत असतो. त्यामुळे खाण्यापिण्याच्या वेळा संभाळा, रोजच अति जड पदार्थ खाऊ नका आणि जास्तीत जास्त तीन ते चार मिनिटच टॉयलेट मध्ये मल विसर्जनासाठी बसावे. लक्षात ठेवा ही एक नैसर्गिक क्रिया आहे. जी योग्य वेळेत शरीरासाठी पूर्ण होणे आवश्यक आहे.

Share This News
error: Content is protected !!