बाळंतपण म्हटलं की अंतर्गत शरीरामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत असतात . त्या नऊ महिन्यांमध्ये प्रत्येक दिवस होणाऱ्या आईसमोर नवीन समस्या निर्माण करत असतो. पण येणाऱ्या बाळासाठी तिच्या आनंदा पुढे ती समस्या काहीच नसते . परंतु बाळंतपण झाल्यानंतर शरीरावर येणारे स्ट्रेच मार्क सौंदर्याला बाधक ठरत असतात . शरीरावर विशेष करून पोटावर ,कमरेवर आणि मांडीवर स्ट्रेच मार्क येत असतात . तर मग हे स्ट्रेच मार्क कमीत कमी यावेत त्यासह बाळंतपणानंतर आलेल्या स्ट्रेच मार्कवर या घरगुती उपायांनी तुम्ही मात करू शकता…
बाळंतपणामध्ये तिसऱ्या महिन्यानंतर साधारणतः पोटातील बाळाची वाढ होऊ लागते . बाळाचे अवयव तयार होत असताना हळूहळू दिवस जसे पुढे सरकतील तसे तुमचे बेबी बंब देखील वाढत जाते. त्यामुळे शरीराची त्वचा ताणली जाऊन स्ट्रेच मार्क पडत असतात. यासाठी तुम्ही आई होणार आहात हे जसे तुम्हाला समजेल तसे आंघोळीपूर्वी शरीराच्या काही ठराविक भागांवर तुम्हाला हलका अगदी दोन-तीन मिनिटे देखील मसाज केला तरी पुष्कळ आहे. मसाज करण्यासाठी तुम्ही खोबऱ्याचे तेल वापरू शकता . आंघोळीपूर्वी तुम्हाला तुमचे पोट ,कंबर, मांडी आणि स्तनांवर खोबऱ्याच्या तेलाने हलका मसाज करायांचा आहे . नऊ महिन्यांपर्यंत हा मसाज घरात का होईना तुम्ही स्वतः कराच . यामुळे स्ट्रेच मार्कची समस्या पुष्कळ कमी होईल. आठव्या महिन्यामध्ये अंघोळ झाल्यानंतर चांगल्या प्रतीच्या बॉडी लोशनचा देखील वापर करा. त्यामुळे शरीराच्या त्वचेमध्ये मॉइश्चर राहील आणि त्वचा तडतडणार नाही .
कोणते बॉडी लोशन किंवा क्रीम वापरावे जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर डॉक्टर देखील सजेस्ट करतात. सातव्या महिन्यानंतर हे स्ट्रेच मार्क दिसून येत असतात . त्यामुळे अधिक वाटत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार क्रीम लावावे . बाळंतपणानंतर सव्वा महिना बाळंतिणीला संपूर्ण शरीराला तेलाने मसाज करूनच अंघोळ घातली जाते. त्यामुळे नऊ महिने थकलेलं शरीर पुन्हा बळकट होण्यास मदत होते . शरीराची मोठ्या प्रमाणावर झीज झाले असल्याने वेगवेगळ्या तेलांचा देखील वापर केला जातो . बाळंतपणानंतर हे मसाज करत असताना खोबऱ्याचे तेल, बदामाचे तेल इत्यादी तेलांनी मसाज अवश्य करा. अंघोळ करताना मसूर पीठ ,हळद आणि कडू जिरे एकत्र करून या मिश्रणाने ज्या भागामध्ये स्ट्रेच मार्क आले आहेत तिथे अवश्य मसाज करा.
तुम्ही नऊ महिने पोटामध्ये बाळाला वाढवल आहे. त्यामुळे अगदी दोन-तीन महिन्यांमध्ये तुम्ही तेलाचा मसाज बंद करत असाल तर काही दिवस साबण ऐवजी डाळीचे किंवा मसूर डाळीचे पीठ घेऊन त्यामध्ये हळद टाकून या पॅकनेच अंघोळ करा . यांने स्ट्रेच मार्कसह शरीरावर निर्माण झालेले काळे डाग देखील हळूहळू निवळत जातील.