Hair salon treatment

रेशमी मुलायम केस हवे असतील तर आजच सोडा ‘या’ 6 सवयी

406 0

आज प्रत्येकासाठी केसांचे खूप महत्व आहे. मग ते पुरुष असो व महिला. प्रत्येकजण उठावदार दिसण्यासाठी आपल्या केसांची निगा राखत असतो. अनेक महिलांना आपले केस रेशमी मुलायम हवे असे वाटत असते. त्यासाठी त्या विविध उपाययोजना करताना दिसतात. केसांची निगा राखण्यासाठी त्या वेगवगळ्या गोष्टी ट्राय करताना दिसतात. चला तर मग आज आपण जाणून घेऊया जर तुम्हाला रेशमी मुलायम केस हवे असतील तर काय उपाययोजना कराव्या लागतील.

1) शॅम्पूचा अतिवापर
वारंवार शॅम्पू (Shampoo) केल्याने केस खराब होतात आणि त्यामुळे केसांमध्ये कोरडेपणा येतो. खूप जास्त किंवा वारंवार शॅम्पू केल्याने केसांचा नैसर्गिक स्निग्धपणा निघून जातो आणि कोरडेपणा येतो. त्यामुळे शॅम्पूचा अति वापर टाळा. जर तुम्हाला शॅम्पू करायचे असतील तर केमिकल फ्री शॅम्पूचा वापर करा.

2) कठोर ब्रशचा वापर
खूप कठोर ब्रश (Brush) वापरल्याने तुमचे केस कठोर आणि कोरडे होतात. कठोर कंगवा किंवा केसांचा ब्रश वापरल्याने केसांच्या मुळांना हानी पोहोचते आणि त्यामुळे केसांमध्ये कोरडेपणा येतो. तुम्हाला रेशमी केस हवे असतील तर मऊ केसांच्या ब्रशचा वापर करा.

3) सल्फेटसह केस उत्पादनांचा वापर
जर तुम्ही कोणताही शॅम्पू किंवा तेल वापरत असाल ज्यामध्ये सल्फेट आढळते, तर ते तुमच्या केसांना कोरडेपणा आणू शकते. सल्फेट केसांना नैसर्गिक तेल काढून टाकून निर्जलीकरण करते आणि यामुळे केस कोरडे होतात.

4) चुकीच्या टॉवेलचा वापर
जर तुम्ही टॉवेल (Towel) जोमाने घासत असाल तर ते तुमच्या केसांनाही इजा करते. टॉवेलच्या साहाय्याने केस सुकवणे सुरक्षित असले तरी अनेक वेळा केस लवकर सुकवण्यासाठी आपण केस जोमाने घासू लागतो, त्यामुळे केसांच्या मुळांना इजा होते. त्यामुळे ही सवय आजच सोडून द्या.

5) केसांसाठी गरम साधनांचा वापर
केस सुकविण्यासाठी किंवा आकार देण्यासाठी वापरला जाणारा हीटिंग ड्रायर वापरणे देखील चुकीचे आहे. त्यामुळे केसांची मुळे कमजोर होतात आणि त्यामुळे केस कोरडे होण्याची तक्रार उद्भवू शकते.

6) केस गरम पाण्याने धुणे
काही लोकांना गरम पाण्यात डोके धुण्याची सवय असते, मग तो उन्हाळा असो की हिवाळा, त्यांना गरम पाण्यातच डोके धुणे आवडते. पण गरम पाण्यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात. केसांना रेशमी ठेवण्यासाठी डोके कोमट पाण्यातच धुवावे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!