SKIN CARE : कोरियन मुलींसारखी चमकदार नितळ त्वचेसाठी ट्राय करा ‘हा’ घरगुती फेसपॅक

898 0

SKIN CARE : नितळ स्वच्छ आणि चमकदार त्वचा असावी असं प्रत्येक मुलीचे स्वप्नच असतं आपण बऱ्याच वेळा पाहिला असेल की कोरियन मुलींची स्किन आपण नेहमीच काचेसारखीच चमकताना पाहतो खरंतर यासाठी त्या मुली अनेक वेगवेगळे प्रकारचे फेसपॅक आणि स्किन केअर रुटीन फॉलो करत असतात पण आज मी तुम्हाला असा एक फेस पॅक सांगणार आहे ज्याचा उपयोग केल्यानंतर तुम्हाला अशी काचेसारखे चमकणारी स्किन मिळेल चला तर मग पाहूयात यासाठी लागणारे पदार्थ… 

मिक्सर जार मध्ये अर्धा टोमॅटो अर्धा बटाटा छोटे काप करून घालावा. हे मिश्रण बारीक करून घेतल्यानंतर यामध्ये हळद ,तांदळाचे पीठ, मध घालून हे मिश्रण एकसारखे हलवून घ्या. आणि हा फेस पॅक 15 ते 20 मिनिटांसाठी चेहऱ्यावर राहू द्या.

चेहरा वीस मिनिटानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या आणि टीप करून त्यावर चांगल्या कंपनीचे टोनर लावा.

कोणताही फेसपॅक लावताना चेहरा आधी तुमच्या नेहमीच्या फेसवॉशने दोन वेळा स्वच्छ धुऊन घ्या.

डेली स्किन केअर रुटीनमध्ये दिवसातून तीन वेळा फेस वॉशने चेहरा स्वच्छ धुणे, त्यानंतर टोनर लावणे आणि मॉइश्चरायझर लावणे विसरू नका.

मॉइश्चरायझरवर सनस्क्रीन लोशन अवश्य लावा.

Share This News
error: Content is protected !!