#BEAUTY TIPS : डोळ्याखालची काळी वर्तुळ अवघ्या आठ दिवसात जातील; करा फक्त हा घरगुती उपाय

1109 0

आजच्या स्किन केअर टिपमध्ये आपण पाहणार आहोत डोळ्याखालची काळी वर्तुळ कमी करण्यासाठी घरगुती उपाय काय करावे. डोळे हा शरीराचा अत्यंत नाजूक अवयव आहे त्यामुळे डोळ्यांनी खालची त्वचा आणि त्यासाठी काही घरगुती उपाय आपण असे पाहणार आहोत ते करताना वैद्यकीय सल्ला अवश्य घ्या

दिवसभरातून कमीत कमी तीन ते चार वेळा थंड पाण्याचे शिपके डोळ्यांना मारावेत. डोळे स्वच्छ ठेवा. सातत्याने डोळ्यांना हात लावणे टाळा.

रात्री झोपताना रोज कापसाच्या पट्ट्या गुलाब पाणी, एलोवेरा जेल मिक्स करून डोळ्यांवर ठेवायचे आहेत. गुलाब पाणी आणि एलोवेरा जेल फ्रीजमध्येच ठेवा म्हणजे आणखी छान थंडावा मिळेल. हे रोजच करा म्हणजे दिवसभराचा थकवा देखील कमी होतो.

दुसरा उपाय आहे तो म्हणजे सहाणेवर बदाम आणि निरस दूध गरजेनुसार घेऊन उगाळणे. आणि ते डोळ्याच्या खाली पंधरा मिनिटे लावून ठेवणे. यामुळे अगदी आठ दिवसांमध्ये तुम्हाला खूप फरक दिसून येईल.

तिसरा उपाय आहे तो म्हणजे बदामाचं शुद्ध तेल . हे तुम्हाला बाजारात मिळेल. या बदामाच्या तेलाने संपूर्ण चेहऱ्यालाच मसाज करा. आंघोळीपूर्वी हा मसाज केला तर उत्तम, चेहऱ्यावर तेल ठेवायचे नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे चेहरा लगेच धुवायचा आहे. बदामाच्या तेलाने मसाज करताना गोलाकार चेहऱ्यावर मसाज करा. डोळ्यांवर मसाज करताना करंगळीच्या शेजारच्या बोटाने अलगद डोळ्याभोवती गोलाकार मसाज करायचा आहे. हा उपाय आठवड्यातून तीन ते चार वेळा करू शकता. याचा देखील संपूर्ण चेहऱ्यावरच खूप चांगला फायदा दिसून येईल.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide