BEAUTY TIPS : पावसाळ्यात पिंपल्स त्रास देत आहेत ? ‘ या ‘ सहज सोप्या घरगुती उपायांनी मिळवा नितळ कांती

296 0

प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं मग ती कोणत्याही क्षेत्रात असो पण आपली स्किन ही नेहमीच चमकदार आणि नितळ दिसावे असेच तिला वाटत असतं . पण कामकाज , रोज फॉलो न करता येणार स्किन केअर रुटीन , वातावरण , बाळंतपण आणि ऋतुमान अशी कित्येक कारणे असतात ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणे हे सामान्य असतं . पण यामुळे सौंदर्यामध्ये नक्कीच बाधा येते. मग अशावेळी घरगुती काही उपाय आहेत ज्यामुळे तुम्हाला या ऋतुमानामुळे येणारे पिंपल्स कमी करता येतील

1. पावसाळ्यामध्ये चेहऱ्यावर ओलावा आणि तेलकटपणा राहणार नाही यासाठी तुम्हाला सूट होत असेल त्याच फेसवॉशने दिवसातून तीन वेळा चेहरा नॉर्मल वॉटरने स्वच्छ धुऊन टॅप करून कोरडा करायचा आहे . चेहरा खसखसून पुसू नका. त्यामुळे चेहऱ्यावर असलेल्या पिंपल मधली इन्फेकशन अधिक पसरू शकते.

2. चेहरा धुतल्यानंतर त्यावर टोनर लावायला विसरू नका . त्यामुळे ओपन पोर्स बंद होतील कोणते टोनर वापरायचे याविषयी योग्य ज्ञान असलेल्या व्यक्तीचा किंवा वैद्यकीय सल्ला घेतला तरीही योग्य…

3. कोरफड जेल हे कोणत्याही प्रकारच्या स्किनला वरदानच आहे. टोनर लावल्यानंतर कोरफड जेल अवश्य लावा. त्यामुळे पिंपल्स देखील कमी होतील त्यासह चमकदार आणि नितळ त्वचा देखील मिळेल.

4. आठवड्यातून किमान दोन वेळा गरम पाण्याची वाफ घ्या.

5. दिवसातून एक वेळा किंवा जेव्हा जमेल तितक्या अधिक वेळा चंदन पावडर गुलाब पाणी आणि कोरफड जेल यांचे मिश्रण चेहऱ्यावर लावा. यामुळे पिंपल पासून लवकरात लवकर आराम मिळेल.

6. एक टोमॅटो बारीक करून त्यामध्ये मध घालून ही पेस्ट चेहऱ्यावर लावा .ही पेस्ट चेहऱ्यावर वाळल्यानंतर स्वच्छ धुऊन घ्या .यामुळे चेहरा चमकदार अवश्य होईल त्यासह टोमॅटोमध्ये एंटीऑक्सीडेंट भरपूर असल्यामुळे पिंपल्सवर देखील लवकर परिणाम दिसून येईल.

7. आंबेहळद आणि दूध एकत्र करून हे मिश्रण चेहऱ्यावर लावा याने पिंपल्सवर लवकर परिणाम दिसून येईल.

8. यासह सर्वात सोपा पर्याय म्हणजे बर्फ बर्फ एका कापडामध्ये गुंडाळून तो 15 ते 20 सेकंद संपूर्ण चेहऱ्यावर गोलाकार पद्धतीने फिरवा त्याहून अधिक फिरवू नका काही वेळाने पुन्हा ही प्रक्रिया केली तरीही चालेल यामुळे देखील पिंपल्स वर चांगला परिणाम दिसून येईल.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide