UPSC

यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर; कश्मिरा संखे राज्यात पहिली

696 0

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा 2022 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत इशिता किशोरने (Ishita Kishore) ऑल इंडिया प्रथम रँक मिळवला आहे. तिच्या पाठोपाठ गरिमा लोहिया, उमा हर्थी एन आणि स्मृती मिश्रा यांचा नंबर लागतो. उमेदवारांना आपला निकाल upsc.gov.in आणि upsconline.nic.in या लिंक पाहता येणार आहे. आयोगाने 24 एप्रिल ते 18 मे 2023 या कालावधीत 582 उमेदवारांची तिसऱ्या टप्प्यातील वैयक्तिक मुलाखत घेतली होती.

यामध्ये इशिता किशोर देशात पहिली तर ठाण्याची कश्मिरा संखे (Kashmira Sankhe) राज्यात पहिली आहे. यंदाच्या यूपीएससी निकालात मराठी मुलांचा दबदबा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. या निकालात वसंत दाभोळकरने 76 वा क्रमांक, प्रतिक जराड 122 वा क्रमांक, जान्हवी साठे 127 वा क्रमांक, गौरव कायंदे-पाटील 146 वा क्रमांक तर ऋषिकेश शिंदे 183 वा क्रमांक, अमर राऊत 277 वा क्रमांक, अभिषेक दुधाळ 278 वा क्रमांक, श्रुतिषा पाताडे 281 वा क्रमांक, स्वप्नील पवारने 287 वा क्रमांक, अनिकेत हिरडेने 349 वा क्रमांक पटकावला आहे.

निवड झालेल्या टॉप १० उमेदवारांची यादी
१) इशिता किशोर
२) गरिमा लोहिया
३) उमा हरति एन
४) स्मृति मिश्रा
५) मयूर हजारिका
६) गहना नव्या जेम्स
७) वसीम अहमद
८) अनिरुद्ध यादव
९) कनिका गोयल
१०) राहुल श्रीवास्तव

कसा आणि कुठे पहाल निकाल ?
निकाल पाहण्यासाठी, सर्व उमेदवारांनी सर्वप्रथम UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in आणि upsconline.nic.in ला भेट द्या. त्यानंतर खाली स्क्रोल करा आणि होमपेजवर उपलब्ध असलेल्या “UPSC सिव्हिल सर्व्हिसेस रिझल्ट 2022” वर क्लिक करा. यानंतर स्क्रीनवर UPSC निकाल 2022 ची PDF दिसेल. ती डाऊनलोड करून घ्या. या पीडीफमध्ये तुम्हाला निवड झालेल्या उमेदवारांच्या रोल नंबरची यादी पाहता येईल. आपला रोल नंबर मिळाल्यास निकालाची प्रत डाऊनलोड करून घ्या.

Share This News
error: Content is protected !!