UPI Lite

UPI Lite : आनंदाची बातमी ! आता GPay वरून PIN न टाकता झटपट करता येईल पेमेंट

1717 0

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेने UPI Lite ही सर्व्हिस लॉन्च केली होती. हि डिजिटल पेमेंट सर्व्हिस नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने डिझाइन केलेली आहे. यामध्ये यूझर्स त्यांच्या युपीआय लाईट अकाउंट सिंगल टॅपने 200 रुपयांपर्यंत पैसे पाठवू शकतात. या सर्व्हिसमध्ये ट्रांझेक्शनसाठी पिन टाकण्याची गरज पडत नाही. डिजिटल पेमेंट सोप्पे व जलद व्हावे यासाठी ही सर्व्हिस सुरु करण्यात आली आहे.

#ONLINE PAYMENT : डिजिटल व्यवहार करताना घ्या ‘ही’ खबरदारी, चुकल्यास होऊ शकते मोठं नुकसान

युपीआय लाईट यूझर्सच्या बँक अकाउंटशी लिंक्ड असते. परंतु, ते रिअल टाइममध्ये बँकेच्या कोअर बँकिंग प्रणालीवर अवलंबून नाही. युपीआय लाईट द्वारे पीक ट्रान्झॅक्शन टाइममध्येही हायर सक्सेस रेट मिळतो. यूझर्स या सर्व्हिसमध्ये दिवसातून दोनदा 2,000 रुपये लोड करू शकतात आणि एकावेळी 200 रुपये देऊ शकतात. Paytm आणि PhonePe या कंपन्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर हे फिचर आधीच जारी केले आहे.

Auto Pay : ऑटो पे वापरताय…? जाणून घ्या काय आहेत फायदे आणि तोटे ?

कशी सुरु कराल ही सुविधा?
सध्या 15 बँका युपीआय लाईटला सपोर्ट करतात. Google Pay मध्ये UPI Lite अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी, तुम्हाला अ‍ॅप उघडावे लागेल. त्यानंतर स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपर्‍यातून प्रोफाइल आयकॉनवर टॅप करा. नंतर खाली स्क्रोल करा आणि युपीआय लाईट हे फिचर शोधा नंतर त्यावर टॅप करावे लागेल, ज्यामुळे इंस्ट्रक्शन आणि डिटेल्ससह एक नवीन स्क्रीन दिसेल. यानंतर तुम्हाला activate UPI Lite वर टॅप करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला बँक अकाउंट लिंक करावे लागेल आणि पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!