पुणे : पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येते आहे. मंत्रालयातील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बनावट सह्यांचा वापर करून सीबीएससीची मान्यता असल्याचे बनावट प्रमाणपत्र विकणारी टोळी कार्यरत असल्याचं उघड झालं आहे. बारा लाख रुपयांचा मोबदला घेऊन शाळांना सीबीएससीची मान्यता असल्याचे बनावट प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा समोर आला आहे.
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातून देखील तीन शाळांची चौकशी करण्यात येणार आहे. पुण्यातील एम पी इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शिवाजीनगर, क्रिएटिव्ह एज्युकेशन पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आणि नमो आर आय एम एस इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या तीन शाळांची सध्या चौकशी सुरू आह. या तीन शिक्षण संस्थांनी बोगस प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रयत्न केल्यास उघड झाले.
धक्कादायक म्हणजे शिक्षण उपसंचालक विभागाने चौकशी सुरू केल्यानंतर पुण्यातील या तीन शाळांबरोबर पुणे जिल्ह्यातील आणखी बारा शाळांची नावे देखील या घोटाळ्यामध्ये समोर आली आहेत.