बोर्ड परीक्षेत कॉपी पुरवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करणार ; शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे आदेश

391 0

महाराष्ट्रात आता कोरोनाचं संकट कमी झाल्यानंतर बोर्डाने पुन्हा दोन वर्षांनंतर पुन्हा ऑफलाईन परीक्षा घेण्याचं आव्हान घेतलं आहे.

दरम्यान बोर्डाच्या परीक्षा यंदा सुरक्षित वातावरणामध्ये आणि कोविड 19 नियमावलीचं पालन करून घेतल्या जात आहे.

विद्यार्थ्यांवरील दडपण कमी करण्याच्या उद्देशाने यावर्षी शाळेतच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र उपलब्ध करून दिली आहेत. पण याचा गैरफायदा घेत काही ठिकाणी शिक्षक विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

काल शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानपरिषदेमध्ये बोलताना ‘असा प्रकार करणार्‍या शाळांची मान्यता रद्द केली जाईल’ असा निर्णय जाहीर केला आहे.

 

Share This News
error: Content is protected !!