ऑफलाईन परीक्षेसाठी विद्यार्थांना मिळणार 15 मिनिटं अतिरिक्त वेळ

433 0

मागील दोन वर्षे कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे वर्ग आणि परीक्षा ऑनलाईन घेण्यात आल्या होत्या. मात्र आता कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असताना विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईन होणार आहेत.

दरम्यान विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतल्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.

कोरोना काळात विद्यार्थ्यांचा लिहीण्याचा सराव कमी झाल्याने, ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेताना वेळ वाढवून देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती, दरम्यान कुलगुरूंच्या बैठकीत विद्यार्थ्यांना प्रति तास १५ मिनिटे वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उच्च तंत्रज्ञज्ञान शिक्षणमंत्री उदय सामंत यानी ट्विट करत सांगितले.

Share This News
error: Content is protected !!