JOBS

SBI Jobs: स्टेट बॅंक ऑफ इंडियात हजारो पदांची भरती; कसा कराल अर्ज?

421 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॅंकेत चांगल्या पगाराची नोकरी मिळावी अशी अनेकांची इच्छा असते. कॉमर्समधून शिक्षण पूर्ण केलेले बहुतांशजण बॅंकेत नोकरी मिळण्याची इच्छा बाळगून असतात. जर तुम्हीदेखील बँकेत काम करण्याचे स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने भरतीचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे. यामध्ये पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ज्युनिअर लिपिकच्या 8 हजार 283 पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठात अथवा शिक्षण संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. मुंबईसह देशभरातील विविध शहरांमध्ये ही भरती केली जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षांदरम्यान असावे. या पदासाठी 750 शुल्क आकारण्यात आले आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शुल्कामध्ये सवलत देण्यात आली आहे.

उमेदवाराची या प्रकारे होणार निवड
या पदांसाठी उमेदवारांची निवड विविध टप्प्यांत होणाऱ्या परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. या अंतर्गत, जानेवारी 2024 मध्ये प्रिलिम परीक्षा आयोजित केली जाऊ शकते. तर मुख्य परीक्षा फेब्रुवारी महिन्यात होऊ शकते. अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाईट चेक करू शकता. SBI लिपिक भर्ती 2023 ची अर्ज प्रक्रिया 17 नोव्हेंबर 2023 पासून सुरु होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 7 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. एसबीआय भरतीची प्राथमिक परीक्षा जानेवारी 2024 ला होणार असून मुख्य परीक्षा फेब्रुवारी 2024 मध्ये होणार आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!