Pan Card

PAN Card कार्ड निष्क्रिय झाले तरी तुम्हाला ‘ही’ 9 कामे करता येणार आहेत

540 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पॅन कार्ड (PAN Card) हे अनेक महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक मानले जाते. पॅन कार्डला (PAN Card) आधार कार्डशी लिंक करण्याची अखेरची तारीख 30 जून 2023 होती. सरकारने ही पुढे वाढवली नाही. यादरम्यान ज्यांनी पॅन-आधार लिंक केले नाही त्यांचे पॅन कार्ड आता निष्क्रिय झाले आहे. एकदा पॅन कार्ड निष्क्रिय झाले तर तुम्ही पैशांचा कोणताही व्यवहार करू शकत नाही. मात्र पॅन निष्क्रिय झाले असले तरी काही आर्थिक व्यवहार तुम्ही करू शकता. चला तर मग ते कोणते व्यवहार आहेत ते पाहूयात…

Pan Aadhaar Link : पॅन-आधार कार्ड लिंक न केल्यास करदात्यांना भरावा लागणार आता ‘एवढा’ दंड

निष्क्रिय पॅन कार्डने (PAN Card) करता येतात ‘हे’ व्यवहार
पॅन निष्क्रिय असले तरीही तुम्हाला बँक एफडीवर व्याज मिळेल. एफडी आणि आरडीकडून मिळणारे -वार्षिक व्याज 40 हजार रुपयांपर्यंत आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 50 हजार रुपयांपर्यंत घेतले जाऊ शकते.
एका आर्थिक वर्षात कंपनी आणि म्युच्युअल फंडांकडून 5 हजार रुपयांपेक्षा जास्त डिव्हिडेंड घेतला जाऊ शकतो.
विक्री किंमत किंवा मुद्रांक शुल्क मूल्य प्रति व्यवहार रुपये 50 लाखांपेक्षा जास्त असल्यास स्थावर मालमत्ता विकता येते.
10 लाख रुपयांच्या वरची कार खरेदी करणे.
ईपीएफ अकाउटं मधून 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढणे.
घरमालकाला महिन्याला 50,000 रुपयांपेक्षा जास्त भाडे देणे.
जर व्यवहार 50 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही वस्तू आणि सर्व्हिस विकू शकता.
कंत्राटी कामांसाठी रु. 30,000 किंवा रु. 1 लाखापेक्षा जास्त पेमेंट करणे.
15,000 रुपयांपेक्षा जास्त कमिशन किंवा ब्रोकरेजचं पेमेंट करणे.

Share This News
error: Content is protected !!