NDRF

NDRF मध्ये भरती कसे होतात? ते कसे काम करतात?

438 0

भारतात दरवर्षी भूकंप, दुष्काळ, अतिवृष्टी, भूस्खलन, हिमस्खलन, चक्रीवादळ, गारपीट अशा अनेक नैसर्गिक आपत्ती घडत असतात. अनेक राज्यांना या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते. अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते. या अशा घटना घडतात तेव्हा एनडीआरएफ (NDRF) टीमच्या जवानांना त्या ठिकाणी पाचारण केले जाते. एनडीआरएफ (NDRF) टीमच्या मदतीने नागरिकांना मदत आणि बचाव कार्य करून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येते. काल सकाळी महाराष्ट्रात रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरळ कोसळल्याची घटना घडली. यावेळी एनडीआरएफ टीमच्या मदतीने बचाव कार्य सुरू करण्यात आले.आपत्तीच्या वेळी यंत्रणा असहाय्य होतात, त्यावेळी हे एनडीआरएफचे जवान आपला जीव धोक्यात टाकून पीडितांचे जीव वाचवण्याचे काम करत असतात. तुम्हाला पण NDRF मध्ये करियर करायचे असेल तर त्यासाठी शिक्षण काय लागते? ते कसे काम करतात? त्यांना पगार किती मिळतो ? हे जाणून घेऊयात…

एनडीआरएफमध्ये भरती होण्यासाठी शिक्षणाची अट
सर्टिफिकेट कोर्सेसपासून ते बॅचलर डिग्री, पीजी डिप्लोमा, मास्टर डिग्री आणि पीएचडी स्तरावरील कोर्सेस आपत्ती व्यवस्थापनामध्ये चालवले जातात. पण, यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून कोणत्याही विषयात इयत्ता 12 वीत किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पीजी डिप्लोमा किंवा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी, पदवी (बीए/बीएससी/बी.कॉम) आवश्यक आहे. उमेदवार या क्षेत्रात बीए, एमए, एमबीए, एमएससी, एमफिल, पीएचडी, रिसर्च, ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये सहभागी होऊ शकतात.

एनडीआरएफमधील प्रवेश अन् प्रशिक्षण
एनडीआरएफमध्ये (NDRF) प्रवेश मिळवण्यासाठी तुम्ही बीएसएफ, सीआरपीएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी आणि एसएसबी यांसारखे पॅरामिलिटरीचे जवान असणे आवश्यक आहे. यातून प्रतिनियुक्तीच्या माध्यमातून एनडीआरएफ जवानांची नियुक्ती केली जाते. या प्रतिनियुक्तीचा काळ 7 ते 9 वर्ष एवढा असतो. एनडीआरएफच्या जवानांना 19 आठवड्यांचे आंतरराष्ट्रीय स्तराचे प्रशिक्षण दिले जाते. ज्यात गिर्यारोहणासह अनेक साहसी प्रकाराचे प्रशिक्षण दिले जाते. यासह आपत्तीग्रस्तांचे प्राण वाचवणे, त्यांना सुरक्षित स्थळी नेणे, शक्य ती सर्व मदत देणे आणि त्यांच्या वैद्यकीय किंवा इतर गरजा पूर्ण करणे याचेदेखील प्रशिक्षण दिले जाते.

एनडीआरएफ जवान कसे काम करतात?
एनडीआरएफ (NDRF) जवानांचे कार्य आपत्तीनंतरची परिस्थिती नियंत्रित करणे किंवा पीडितांना मदत करणे इतकेच मर्यादित नाही. ते आपत्तीपूर्वीचा धोक्याचा इशारा देण्यासाठी डिझास्टर अलर्ट सिस्टम विकसित करतात. हे जवान आपत्तीच्या काळात सरकारी यंत्रणेला मदत करतात. पोलीस, लष्कराचे कर्मचारी आणि सामाजिक संस्थांसोबत बचाव कार्यात सक्रिय सहभाग घेतात.विविध नैसर्गिक आपत्तींची भीती निर्माण होताच, एनडीआरएफ संपूर्ण भारतभर मदत आणि बचाव कार्यासाठी आपली टीम तैनात करत असते.

एनडीआरएफ जवानांना किती मिळते पॅकेज ?
डिझास्टर मॅनेजमेंटचा सर्टिफिकेट कोर्स केल्यानंतर सुरुवातीला महिन्याला 25 ते 30 हजार रुपये पगार सहज मिळू शकतो. पुढील अनुभवानुसार, पगार 50 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत वाढू शकतो. पदव्युत्तर अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला तीन ते चार लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज दिले जाते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!