MHT CET Result

MHT CET परीक्षेचा निकाल 12 जून रोजी; सकाळी 11 वाजता होणार जाहीर

432 0

मुंबई : राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे (MHT CET Result 2023) अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल 12 जून रोजी सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. कॅप राउंड संदर्भातील वेळापत्रक निकाल जाहीर होताच जाहीर केले जाणार आहे. या अगोदर विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश नोंदणी करता येणार आहे.

प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे
प्रवेश प्रक्रिया राबविताना अ‍ॅप्लीकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (API) प्रणालीचा उपयोग करण्यात येणार आहे. सदर प्रणालीद्वारे बारावी गुण, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, आर्थिकदृष्टया दुर्बल घटक जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलीअर प्रमाणपत्र, कृषी शिक्षण व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीत लागणारा सात-बारा उतारा. प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक प्रमाणपत्र दाखले यांची पडताळणी करण्यात येणार आहे.

MHT CET परीक्षा दोन सत्रांत घेण्यात आली होती
राज्य प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) एमएचटी सीईटी 9 ते 21 मे या कालावधीत घेण्यात आली. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स ग्रुपची (पीसीएम) परीक्षा 9 ते 13 मे दरम्यान घेण्यात आली होती. तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ग्रुपची (पीसीबी) परीक्षा 15 ते 20 मे या कालावधीत पार पडली होती. पीसीएम आणि पीसीबीच्या परीक्षा दोन सत्रांत घेतल्या होत्या. पहिल्या सत्राची परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसऱ्या सत्राची परीक्षा दुपारी 2 ते 5 या वेळेत झाली होती.

Share This News
error: Content is protected !!