CBSE Exams 2024

CBSE Exams 2024 : 10वी-12वीच्या पेपर पॅटर्नमध्ये मोठा बदल

562 0

CBSE बोर्डाने 2024 च्या पेपर पॅटर्नमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत. विद्यार्थ्यांना हे नवीन पेपर पॅटर्न समजावेत यासाठी बोर्डाने सॅम्पल पेपर्सचा सेट जारी केला आहे. या सॅम्पल पेपर्सच्या मदतीने विद्यार्थ्यांना (10 वी आणि 12 वी) या वर्षीच्या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील आणि त्यांची मार्किंग स्कीम काय असेल हे सहजपणे कळू शकेल. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आपल्या वेबसाईटवर नवीन नमुने जारी केले आहेत. यावेळी सर्वात मोठा बदल म्हणजे आता 50 टक्के प्रश्न कॉम्पिटेन्सीवर आधारित असणार आहेत. तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाइटवरून नमुना पेपर आणि मार्किंग स्कीम दोन्ही तपासू शकता.

कसे कराल चेक ?
नवीन नमुना पेपर डाउनलोड करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाईटवर cbseacademic.nic.in. या वेबसाईटला भेट द्या.
येथे मुख्यपृष्ठावर, प्रश्नावली नावाचा विभाग शोधा आणि त्यावर क्लिक करा.
येथून अतिरिक्त सराव प्रश्नांवर जा आणि क्लिक करा.
असे केल्याने एक नवीन पेज उघडेल. या पृष्ठावर तुम्हाला अतिरिक्त सराव प्रश्न दिसतील.
विषयानुसार ते येथून डाउनलोड करा आणि तपासा.
आता यावेळेस कोणते प्रश्न येतील ते कळेल.

बोर्डाच्या पूर्व परीक्षा काही महिन्यांत सुरू होणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास सोप्पे जाणार आहे. उमेदवार नमुना पेपर डाउनलोड करून नवीन पॅटर्न समजून घेऊ शकत नाहीत तर त्यानुसार तयारी देखील करू शकतात.

Share This News
error: Content is protected !!