सावधान…! UGC NET परीक्षेसंदर्भात सोशल मीडियावर फिरते आहे बनावट नोटीस

276 0

सोशल मीडियावर उपयुक्त माहिती पेक्षा अधिक फसवणूक , खोटी माहिती असे एक ना अनेक पोस्ट व्हायरल होत असतात . तुम्ही जर यूजीसी नेट परीक्षेची तयारी करत असाल तर या पोस्टकडे दुर्लक्ष करा. 

UGC NET 2022: युजीसी नेट परीक्षेसंदर्भात सोशल मीडियावर बनावट नोटीस व्हायरल, बळी पडू नका

सोशल मीडियावर यूजीसी नेट परीक्षे संदर्भात फिरणारी ही पब्लिक नोटीस फेक आहे. या नोटीस मध्ये यूजीसी नेट परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याचे सांगण्यात आले असून , ही परीक्षा निर्धारित वेळेमध्येच घेतली जाणार आहे . यूजीसी नेट परीक्षा 12 13 14 ऑगस्ट 2022 रोजीच होणार आहे .

यूजीसीने यापूर्वीच याची घोषणा केली आहे . याविषयी पीआयबी फॅक्ट चेकने ही नोटीस पूर्णपणे फेक असल्याचे स्पष्ट केले आहे . एनटीए ने जाहीर केलेल्या यूजीसी नेट 2022 च्या वेळापत्रकानुसार सहाय्यक प्राध्यापक आणि जेआरएफ ही परीक्षा 8,9 11 12 जुलै आणि 12 , 13 ,14 ऑगस्ट रोजी होणार आहे.

उमेदवारांना लवकरच ऍडमिट कार्ड देखील डाऊनलोड करता येणार असून , प्रवेशपत्र  https://ugcnet.nta.nic.in/ या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide