Kolhapur News

Kolhapur News : कोल्हापूरमधील युवक ‘ते’ कृत्य करून फसला; अन् आपला डोळा गमावून बसला

583 0

कोल्हापूर : कोल्हापूरमधून (Kolhapur News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत लोखंडी नळामध्ये लावलेला सुतळी बॉम्ब उडत का नाही हे पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या तोंडावर अचानक सुतळी बॉम्ब फुटल्याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावात गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान घडली. सदर तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काय घडले नेमके?
सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत लोखंडी नळामध्ये लावलेला सुतळी बॉम्ब उडत का नाही हे पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या तोंडावर अचानक सुतळी बॉम्ब फुटल्याने तरुणाला एक डोळा गमवावा लागला असून भारत संभाजी चव्हाण (वय वर्ष 28) राहणार देवाळे तालुका पन्हाळा असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. या दुर्घटनेत भारतला आपला डावा डोळा गमवावा लागला आहे. ही घटना गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास घडली.

गणेश विसर्जनानिमित्त कोडोली येथे विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. देवाळे गावातील भारत चव्हाण हा आपल्या कुटुंबासमवेत मिरवणूक पाहण्यासाठी कोडोली या गावामध्ये आला होता. दहा वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येत होती. यावेळी एका मंडळातील युवकाने लोखंडी पाईपमध्ये सुतळी बॉम्ब लावला.मात्र, हा बॉम्ब का उडत नाहीय हे पाहण्यासाठी भारत चव्हाण पाईपजवळ गेला. मात्र, याच वेळी अचानक त्याच्या तोंडावर हा बॉम्ब फुटला. यात तो गंभीर जखमी झाला. शिवाय डोळ्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला यामुळे तो बेशुद्ध पडला. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेत भारतला आपला डावा डोळा गमवावा लागला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!