Chandrapur News

Chandrapur News : कृषी सेवक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाला मात्र अचानक गंभीर आजारानं ग्रासलं, अन् संपूर्ण चंद्रपूर हळहळलं

13293 0

चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये (Chandrapur News) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये (Chandrapur News) एका तरुणाने व्हॉट्सॲप स्टेटसवर जळत्या चितेचा फोटो ठेवून आपल्या आयुष्याचा धक्कादायक शेवट केला आहे. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर या ठिकाणी घडली आहे. दिनेश चावरे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
दिनेश चावरे या तरुणाने दिवस रात्र एक करत शिक्षण घेतले होते. 2020 मध्ये कृषी सेवक पदाची परीक्षा त्याने उत्तीर्ण केली होती. कृषी सेवक पदावर निवड झाल्याचे पत्रही त्याला मिळाले होते. मात्र यादरम्यान दुर्दैवाने त्याला ओस्टिओमायलिटिस (Osteomyelitis) नावाचा हाडांचा गंभीर आजार झाला. या आजाराने डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याचा एक पाय कंबरेपासून पूर्णपणे कापला गेला. ऐन तारुण्यात त्याला कुबड्याचा आधार घ्यावा लागला. या आजाराने त्याला असह्य वेदना व्हायच्या. आजारातून मुक्तता व्हावी म्हणून आई-वडिलांनी लहान मोठ्या रुग्णालयात उपचार केले. पाण्यासारखा पैसा खर्च केला. मात्र हा आजार काही बरा झाला नाही.अखेर शेवटी त्याने नैराश्यातून मंगळवारी आपल्या आयुष्याचा शेवट केला.

या अगोदर त्याने आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर जळत्या चितेचा फोटो ठेवून त्याला कॅप्शन दिले , “याच्यासाठी, त्याच्यासाठी, नुसताच पळत होता. सगळेच गेले घरी निघून हा एकटाच जळत होता”. यानंतर त्याने त्याच रात्री बारा वाजताच्या सुमारास गावातीलच सार्वजनिक विहिरीत उडी घेतली. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. दिनेशच्या मृत्यूपश्चात आई, वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे. या घटनेची नोंद सिंदेवाही पोलिसांत करण्यात आली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!