Nanded Crime

धक्कादायक! चुकीचे इंजेक्शन दिल्याने तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

9825 0

नांदेड : नांदेडमध्ये (Nanded) एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे मुलीचे कुटुंबीय आक्रमक झाले असून त्यांनी संबाधित डॉक्टरवर गुन्हा (Crime) दाखल करण्याची मागणी केली आहे. यासाठी मुलीच्या कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
प्रजापती लांडगे (Prajapati Landge) असे मृत पावलेल्या तरुणीचे नाव आहे. ती नर्सिंग कॉलेज मध्ये प्रथम वर्षात शिकत होती. 18 मे रोजी नर्सिंग कॉलेजमध्ये असताना तिला अस्वस्थ वाटू लागले. ही बाब तिने आपल्या कॉलेजच्या मैत्रिणी आणि अधिकाऱ्यांना सांगितली. यानंतर त्यांनी तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिची प्रकृती अधिक खालावल्याने डॉक्टरांनी तिला ताबडतोड विष्णुपूरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

मात्र अखेर 19 मे रोजी सकाळी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर तरुणीचा मृत्यू चूकीचे इंजेक्शन (Wrong injection) दिल्यानेच झाल्याचा आरोप तरुणीच्या नातेवाईकांनी केला आहे. यामुळे सबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका तरुणीच्या नातेवाईकांनी घेतली आहे. मागच्या 4 दिवसांपासून तरुणीचा मृतदेह शासकीय रुग्णालयातील शवागृहात आहे.

Share This News
error: Content is protected !!