Crime

Pune Crime : पुणे हादरलं ! दांडिया खेळताना झालेल्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला

7020 0

पुणे : पुण्यामधून (Pune Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दांडिया खेळताना झालेल्या वादातून तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले. सिंहगड रस्ता भागात रात्रीच्या भागात रात्रीच्या सुमारास हि घटना घडली आहे. अक्षय कांबळे (वय 25, रा. धायरी-नऱ्हे रस्ता) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

काय घडले नेमके ?
अक्षय दांडिया खेळण्यासाठी गेला होता. दांडिया खेळताना काठी लागल्याने त्याचा आरोपींशी वाद झाला. यानंतर अक्षय आणि त्याचा मित्र आदित्य दुचाकीवरुन नऱ्हे-धायरी रस्त्याने निघाले होते. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी अक्षय आणि आदित्यला अडवले. त्यांना शिवगाळ करुन मारहाण केली. अक्षयच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून त्याच्यावर शस्त्राने वार करण्यात आले.

या प्रकरणी कांबळेने याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून सध्या आरोपींचा शोध सुरु आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश गोसावी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!