Molested

Molested : पुण्यात तरुणीची छेड काढल्याप्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल

698 0

पुणे : पुण्यातील भोर तालुक्यातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. एका तरुणाने तरुणीची छेड (Molested) काढत आपल्या काही साथीदारांच्या मदतीने मुलीच्या नातेवाईकाला बेदम मारहाण केली. या घटनेमुळे व्यथित होवून पीडित तरुणीने फिनाइल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणाची (Molested) दखल घेत भोर पोलिसांनी 10 जणांविरोधात गुन्हा (Crime) दाखल केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अक्षय याने पीडित तरुणी तिच्या घरी असताना 31 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घरामध्ये जबरदस्तीने घुसून तरुणीशी गैरवर्तन केले. त्यावेळी तरुणीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने फिर्यादीस हाताने मारहाण करत शिवीगाळ दमदाटी केली.

त्यानंतर 5 जून ते 8 जूनच्या दरम्यान सदर तरुणी कॉलेजला जात होती. त्यानंतर आरोपी अक्षयने सदर तरुणीचा मोटार सायकलवरून पाठलाग केला. या प्रकाराला कंटाळून तरुणीने 17 जून रोजी आपल्या राहत्या घरात बाटलीत असलेले फिनाइल पित आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान तरुणीला त्रास होत असल्याने, शेजारील महिलेने तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर आरोपीने आपल्या साथीदारांच्या मदतीने पीडितेचा नातेवाईक असलेल्या ओंकार आवाळे यालाही मारहाण केली.

या प्रकरणी तरुणीने (Molested) पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अक्षय शिंदे आणि त्याचे साथीदार रोहित शिंदे, बाबू शिंदे, प्रतीक दुधाळ, सोन्या बांदल, मयूर साळेकर, संकेत शिर्के, समीर जाधव, आदिल जमादार, चिक्या शिवतरे अशा एकूण 10 जणांवर भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी भोर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Share This News
error: Content is protected !!