Yavatmal News

Yavatmal News : बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकाची निर्घृणपणे हत्या; यवतमाळमधील घटना

643 0

यवतमाळ : यवतमाळमधून (Yavatmal News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील वाघाडी जांब येथे एका शिवसैनिकाची चाकूने सपासप वार करून निर्घृणपणे हत्या (Murder) करण्यात आली आहे. योगेश नरहरी काटपेलवार (Yogesh Narahari Katpelwar) असे मृत शिवसैनिकाचे नाव आहे. जुन्या वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. योगेश यांना जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच यवतमाळ ग्रामीण पोलीस (Yavatmal Rural Police) तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जुन्या वादातून ही हत्या झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित व्यक्तीसह महिलेलाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हि हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली याचा उलगडा लवकरच होईल असा विश्वास यवतमाळ पोलिसांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे आज बाळासाहेबांचा स्मृतिदिन आहे. आणि याच दिवशी शिवसैनिकाची हत्या करण्यात आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sharad Pawar : ‘साहेब आम्हाला न्याय द्या’ शाळेच्या रस्त्यासाठी चिमुकल्यांनी शरद पवारांना दिले निवेदन

SBI Jobs: स्टेट बॅंक ऑफ इंडियात हजारो पदांची भरती; कसा कराल अर्ज?

Yavatmal News : शेतात आलेल्या महावितरणच्या अभियंत्याला शेतकऱ्याकडून मारहाण

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!