Yavatmal News

Yavatmal News : यवतमाळ हादरलं ! निंबी या ठिकाणी कारखाली येऊन 10 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

735 0

यवतमाळ : पुसद तालुक्यातील निंबी येथे दि.23 ऑगस्ट 2023 रोजी चारचाकी वाहनाने दिलेल्या एका 10 वर्षीय चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वसंत नगर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नींबी येथे 23 ऑगस्ट रोजी सकाळी आंदाजे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वाशिम मार्गे पुसद कडे येणाऱ्या चार चाकी कारने (क्रमांक एम. एच. 19 बी. जे. 7847) निंबि येथील रहिवासी असलेला ओंकार किसन लांडगे वय 10 वर्ष हा चिमुकला रस्ता ओलांडत असताना त्यास जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जबर होती की ओंकारच्या डोक्याला जबर मार लागला आणि पायावरून चार चाकी वाहन गेल्याने उजवा पाय गुडघ्यातून खाली तुटला व तो जागीच ठार झाला.

हा अपघात होताच गावातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन मृतक ओंकार लांडगे यास खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्यास डॉक्टरांनी मृत घोषित केले.मृतक ओंकार लांडगे यास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदनाकरिता करिता आणण्यात आले.मृतक ओंकार लांडगे हा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील दोन ते तीन महिन्या पहिलेच वारले होते.

आणि आई कामाकरिता पुण्याला गेली होती तर मृतक ओंकार लांडगे हा लहानपणापासून त्याच्या आजीजवळ निंबी येथे राहत होता. पोलिसांनी पंचनामा करून घटनेतील चारचाकी वाहन वसंत नगर पोलीस स्टेशन येथे जमा केले आहे. सदर प्रकरणाचा अधिक तपास वसंत नगर पोलीस स्टेशनचे पोलीस करीत असून या घटनेमुळे निंबी गावातील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!