Yavatmal Crime

Yavatmal Crime : धक्कादायक ! यवतमाळमध्ये भरधाव ट्रकने पोलिसालाच चिरडले

1019 0

यवतमाळ : यवमाळमध्ये (Yavatmal Crime) एक भीषण अपघात घडला आहे. नागपूर तुळजापूर राष्ट्रीय मार्गावर वाहनांची तपासणी करणाऱ्या हायवे पोलिसांच्या वाहनाला एका भरधाव आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती कि, या अपघातामध्ये एक पोलीस कर्मचारी व आयशरचा चालक जागीच ठार झाले आहेत. तर दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

काय घडले नेमके?
नागपूर तुळजापूर राष्ट्रीय मार्गावरील कोसदणी घाटात मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. महामार्ग पोलीस यावेळी एक ट्रक थांबवून त्याची कागदपत्रे तपासत होते. त्याचवेळी मागून आलेल्या भरधाव आयशर ट्रकने हायवे पोलिसांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. यावेळी तपासणीसाठी रस्त्यावर उभ्या असलेला पोलीस कर्मचारी हा तपासणीसाठी थांबलेला ट्रक आणि आयशर यांच्यामध्ये चिरडला गेला.

ही धडक एवढी भीषण होती कि, या अपघातत संजय नेटके या पोलीस कर्मचाऱ्याचा आणि आयशर चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर त्यावेळी उपस्थित असलेले अन्य दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!