Women Suicide

Chhatrapati Sambhajinagar : ना कुठलं भांडण, ना कुठली अडचण विवाहितेने उचललेल्या ‘त्या’ पावलामुळे सगळेच हादरले

824 0

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) पैठण रोड नक्षत्रेवाडी या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका विवाहित महिलेने राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. ही घटना रविवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके?
ज्योती जयवंत पागोरे (वय 35, नक्षत्रेवाडी पैठण रोड) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. ज्योती यांचे पती जयवंत खाजगी नोकरीला आहे. 14 वर्षांपूर्वी ज्योती यांचा विवाह जयवंत यांच्याशी झाला होता. त्यांना दोन मुली आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे त्या दोन्ही पोरी आता पोरक्या झाल्या आहेत. रविवारी असल्यामुळे सगळेजण घरीच होते.

मात्र सायंकाळी पतीच्या प्रकृती अस्वस्थामुळे ज्योती आणि जयवंत हे रुग्णालयात उपचारासाठी गेले. उपचार घेऊन घरी परत आल्यानंतर सर्वजण घरी असतानाच ज्योती यांनी घरातच गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला. काही वेळाने पतीच्या लक्षात येताच त्यांनी ज्योती यांना तात्काळ खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Share This News
error: Content is protected !!