वाह रे पठ्या ! पुण्याजवळील या गावात शेतकऱ्यांनी केली गव्हाच्या शेतात अफूची लागवड; पोलिसांकडून 11 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
पुणे (होळकरवाडी) : पुण्यापासून काही अंतरावर असणाऱ्या होळकरवाडी या गावांमध्ये दोन शेतकऱ्यांनी चक्क गव्हाच्या शेतात अफूची लागवड केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं असून, त्यांच्याकडून तब्बल 11 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पोलिसांनी दोघांना अटक केली असून यापैकी राजाराम होळकर आणि बाळू कटके यांच्याकडून 11 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलिसांनी होळकरवाडी परिसरामध्ये ओढ्यालगत असलेल्या शेतामध्ये काही शेतकरी अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने गव्हाच्या शेतामध्ये अफूच्या पिकाची लागवड केल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी केलेल्या या कारवाईला यश आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमणी तलाव परिसरामध्ये विशेष पथकाला अफू या पिकाची लागवड होत असल्याचं निदर्शनास आल आहे. त्यानुसार या पथकाने अफूची शेती नष्ट केली असून 11 लाख 60 हजार रुपये किमतीच्या 116 किलोग्रॅम वजनाची अफू 1374 झाडे जप्त केली आहेत.
