Viral chat

भावा मित्र नाही पैसा कमव! हॅकरने तरुणाला दिला महत्वाचा सल्ला

620 0

शहरात सध्या आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सायबर भामट्यांकडून पार्ट टाईम जॉब देण्याच्या नावाखाली व्हिडीओ लाईक करण्याचे टास्क देऊन फसवणूक (Fraud) होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या टास्कमुळे अनेक लोकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. तंत्रज्ञान जसजसे वाढत आहे त्याप्रमाणे हॅकर्स (Hacker) त्यांच्या कामाची पद्धतही बदलत आहेत. हॅकर्स आता युजर्सची माहिती चोरण्यासाठी आणि बँकिंग पासवर्ड फोडण्यासाठी नवीन पद्धत अवलंबताना दिसत आहे. सध्या अशीच एक हॅकिंगची घटना समोर आली आहे. यामध्ये स्कॅमरने एका व्यक्तीला धडा शिकवला आहे. या दोघांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

काय आहे व्हॉट्सअप चॅटमध्ये?
व्हायरल स्क्रिनशॉट्समध्ये (Screenshot) तुम्ही पाहू शकता, हॅकिंग करणाऱ्याने महेश नावाच्या तरुणाला व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp Chat) मेसेज करत लिहिले आहे की, नमस्कार, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. मला तुमच्या वेळेतील काही मिनिटे मिळतील का?” व्हॉट्सअ‍ॅपवरील हा मेसेज बघून महेशला संशय आला. यामुळे त्यांनी त्यांच्याच शैलीत उत्तर दिलं. काहीही विचार न करता महेशनं लिहिले की, मला तुमच्याशी मैत्री करायची आहे. फ्रॉड करणाऱ्या तरुणाने पुढे त्याचे नाव सांगून काही मिनिटांत तो हजारो रुपये कसे कमवू शकतो हे सांगितले.

महेश (Mahesh) याला बळी पडला नाही आणि पुढे लिहिलं, मी इमानदार आहे. चांगल्या मित्रांचे नेहमी दोन चेहरे असतात असं तो म्हणाला. त्यावर स्कॅमरने उत्तर दिलं मित्र बनवण्यापेक्षा पैसे मिळवणं जास्त चांगलं आहे. सध्या या दोघांच्या चॅटिंगचे स्क्रीनशॉर्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. महेश नावाच्या ट्विटर युजरने त्यांच्या दोघांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट ट्विटरवर पोस्ट करत, स्कॅमरला चांगलीच अद्दल घडवली आहे. नेटकऱ्यांनी महेशच्या पोस्टवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Share This News
error: Content is protected !!