मुंबई : आपल्या देशाने कितीही प्रगती केली तरी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. पोलीस प्रशासन 24 तास तैनात असताना देखील महिलांसोबत गैरव्यवहार केल्याच्या घटना रोज घडताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत अश्लील वागणूक केली जाते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये एका तरुणीने छेड काढणाऱ्या वृद्धाला चांगलाच धडा शिकवला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Kalesh B/w A old man and Lady over misbehaving with herpic.twitter.com/XO1RXXNBnp
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) May 17, 2023
काय आहे व्हिडिओमध्ये ?
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी एका वृद्धाला चपलेने जोर जोरात मारहाण करताना दिसत आहे. ही मुलगी प्रचंड चिडलेली दिसत आहे. त्यामुळे यावरुन असा अंदाज लावला जात आहे की, त्या व्यक्तीने या मुलीशी काहीतरी गैरवर्तन केले असणार. ही मुलगी वृद्धाला मारहाण करताना दिसत आहे. यादरम्यान एक व्यक्ती त्या ठिकाणी येतो आणि या मुलीला अडवण्याचा प्रयत्न करतो.
@gharkekalesh नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.