Death Video

Death Video : जीममध्ये ट्रेडमिलवर धावताना 21 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

394 0

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना घटना घडली आहे. यामध्ये ट्रेडमिलवर धावत असताना 21 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू (Death Video) झाला आहे. ही संपूर्ण घटना जिममध्ये असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय घडले नेमके?
शनिवारी खोडामधील सरस्वती विहार परिसरातील जीममध्ये व्यायाम करत असताना सिद्धार्थ हा अचानक कोसळला. यानंतर जिममधील बाकी लोकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. त्याचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

सिद्धार्थ हा पालकांचा एकुलता एक मुलगा होता. तो नोएडामधील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाला शिकत होता. तर सिद्धार्थ हा मूळचा बिहारमधील सिवानचा रहिवासी आहे. सिद्धार्थाच्या वडिलांचं नाव विनय कुमार तर त्याची आई बिहारमध्ये शिक्षिका आहे. तो दररोज प्रमाणे शनिवारीही सकाळी 11.10 वाजता जिममध्ये व्यायमासाठी गेला असताना ही दुर्दैवी घटना घडली.

Share This News
error: Content is protected !!