Satara Crime

Satara Crime : साताऱ्यात जनरेटरचा भीषण स्फोट; 8 चिमुकले गंभीर जखमी

507 0

सातारा : महाबळेश्वर येथील कोळी आळी मधील दुर्गा माता मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान एक मोठी भीषण दुर्घटना (Satara Crime) घडली आहे. यामध्ये जनरेटरचा स्फोट झाल्याने मोठा अपघात झाला आहे. जनरेटरच्या पेट्रोल पाईपला गळती लागली आणि जनरेटरने पेट घेतला. धक्कादायक म्हणजे या अपघातामध्ये दुर्गा देवीच्या मूर्तीजवळ बसलेली आठ छोटी मुलं गंभीर जखमी झाली आहेत. सर्व मुलं चार ते आठ वयोगातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओदेखील समोर आला आहे.

या दुर्घटनेत मुलांच्या अंगावरील सर्व कपडे जळाले आहेत. सर्व जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर सर्वांना पुढील उपचारासाठी सातारा येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तर गंभीर असणाऱ्या तीन मुलांना पुण्याला हलवण्यात आलं आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ही दुर्घटना नेमकी कशी घडली याचा तपास सुरु आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, स्फोट झाल्यानंतर एकच धावपळ उडाली. जनरेटरच्या पाईपला गळती लागल्यामुळे जनरेटरने पेट घेतला आणि हा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनीही तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन जखमी मुलांना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!