Vasai News : श्रावणी सोमवारनिमित्त दर्शनासाठी गेलेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू

691 0

वसई : वसईमध्ये (Vasai News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Vasai News) बुलेटवरून प्रवास करणे एका महिलेच्या जीवावर बेतले आहे. यामध्ये पतीसोबत श्रावणी सोमवारनिमित्त दर्शनासाठी मंदिरात जात असताना बुलेटच्या मागच्या चाकात ओढणी अडकल्यामुळे गळफास बसून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कांदिवलीमधील ही महिला वसईच्या तुंगारेश्वर येथे महादेवाचं दर्शन घेण्यासाठी पतीसोबत गेली होती. दर्शन घेऊन परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे.

काय घडले नेमके?
कांदिवली येथे राहणाऱ्या प्रतिमा यादव या श्रावणी सोमवार निमित्ताने आपल्या पतीसोबत वसईच्या तुंगारेश्वर मंदिरात देव दर्शनासाठी आल्या होत्या. परतीच्या प्रवासात महामार्गावरून पुन्हा घरी परतत असताना बुलेटच्या पाठीमागे बसलेल्या प्रतिमा यांची ड्रेसचीं ओढणी बुलेटच्या मागच्या चाकात अडकली. ओढणी चाकात अडकल्याने प्रतिमा यादव यांच्या गळ्याला फास लागला.

यानंतर प्रतिमा यांना पतीने उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबई अहमदाबाद महामार्गांवरील बाफाने फाट्याजवळ ही घटना घडली आहे. या घटनेमुळे यादव कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!