Vasai News

Vasai News : तोल गेल्याने वाहत्या नाल्यात पडून व्यक्तीचा मृत्यू

771 0

पालघर : वसईमध्ये (Vasai News) एक धक्कादायक घटना घडली आहे. बिस्कीट आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका व्यक्तीचा वाहत्या नाल्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ब्रायन कार्व्हालो (वय 46) असे या दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय घडले नेमके?
पालघर जिल्ह्यात मागच्या 4-5 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाने अक्षरशः जिल्ह्यात थैमान घातले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी देखील साचले असून यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. ब्रायन कार्व्हालो गुरुवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास बिस्कीट आणण्यासाठी आपल्या घराबाहेर पडले होते. मुसळधार पावसातच घरासमोर असलेल्या नाला ओलांडताना त्यांचा तोल गेल्याने अचानक ते नाल्यात पडले आणि पाण्याच्या प्रवाहात नाल्यात वाहून गेले.

Jalna News : शेळ्या चारायला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

ब्रायन कार्व्हालो घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी यांचा सर्वत्र शोध सुरु केला. काही वेळाने ब्रायन कार्व्हालो नाल्यात पडलेले कुटुंबीयांना त्यांच्या आढळून आले. यानंतर ब्रायन कार्व्हालो यांच्या कुटुंबीयांनी ब्रायन कार्व्हालो यांना तात्काळ उपचारासाठी वसई बंगली परिसरातील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!