Beed:

पुण्यातील नामांकित हॉस्पिटलमध्ये विनयभंगाचा प्रकार; वॉर्डबॉय वर गुन्हा दाखल

484 0

पुण्यातील एका नामांकित हॉस्पिटल मध्ये आजbवॉडबॉयने महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून संबधित वॉडबॉयवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका 42 वर्षीय महिलेनी दिलेल्या फिर्यादीवरून वॉर्डबॉय आयाज शेख (25, रा. राजीव गांधी झोपडपट्टी, खडकी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांनी त्यांच्या मुलाच्या हाताचे ऑपरेशन करण्यासाठी प्रायव्हेट रूम घेतली होती. त्या रूममधील बाथरूमध्ये आंघोळीसाठी गेल्या असताना हॉस्पीटलमध्ये काम करणारा आयाज याने त्या ठिकाणी बेडशीट बदलण्यासाठी येऊन बेडशिट बदलुन झाल्यानंतर शेजारच्या रूमच्या जाळीतून महिलेला अंघोळ करताना पाहिले. नंतर तिचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याबाबत फिर्यादीत म्हटले आहे.

Share This News
error: Content is protected !!