Nashik News

Nashik News : नाशिक हळहळलं ! दोन कर्त्या तरुणांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

721 0

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील (Nashik News) सिन्नर तालुक्यात असलेल्या घोटी महामार्गावर हरसुले येथे ट्रक आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात सिन्नर तालुक्यातील कोनांबे येथील दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गणेश डावरे (वय 17) आणि दुर्गेश डावरे (वय 22) असे मृत तरुणांची नावं आहेत. अपघाताच्या या दुर्दैवी घटनेत दोन कर्त्या तरुणाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कसा घडला अपघात?
गणेश आणि दुर्गेश सकाळच्या सुमारास आपली पल्सर दुचाकी क्रमांक एम.एच.15 जे. जी. 9645 ने कोनांबे येथून सिन्नरकडे निघाले होते. यावेळी हरसुले गावाजवळील मराठी शाळेसमोर आले असता समोरुन विरुद्ध दिशेने आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती कि, या दोघांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हा अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेशी संपर्क साधून जखमी तरुणांना तात्काळ सिन्नर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दोघांना मृत घोषित केले. ऐन नवरात्रोत्सवाच्या काळात दोन्ही तरुणांच्या अपघाती मृत्यूमुळे कोनांबे गावावर शोककळा पसरली आहे. नाशिक पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!