Washim Accident News

Washim Accident News : धोकादायक वळणावर बाईक आणि कारचा भीषण अपघात; 3 जण जखमी

1212 0

वाशीम : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण (Washim Accident News) खूप वाढले आहे. रस्त्यावर वाहन चालवताना (Washim Accident News) काळजी घेण्याचं, सतर्क राहण्याचं आवाहन लोकांना वारंवार केलं जातं. काहीजण या नियमांचं पालन करतात तर बरेचजण याकडे दुर्लक्ष करतात. याच निष्काळजीपणामुळे काही लोकांना आपला जीव गमवावा लागतो. सध्या आणखी एक अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

काय घडले नेमके?
हि अपघाताची घटना वाशीममध्ये घडली आहे. वाशिमच्या कारंजा मानोरा मार्गावरील वापटा घाटात कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकी वरील दोघे आणि कार मधील लहान मुलगी असे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.

अपघातात जखमी झालेल्यांना यवतमाळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दुचाकी आणि कार मधील अपघाताचा थरार कार मध्ये लावलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. हा अपघात खूपच भयंकर होता. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या अपघाताचा व्हिडिओ पाहून तुम्हाला अपघाताची भीषणता लक्षात येईल.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!