यशश्रीच्या शरीरावर दोन टॅटू, एक दाऊदचा तर दुसरा…; पोलीस तपासातून समोर आली धक्कादायक माहिती 

633 0

संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारी घटना उरण शहरात घडली होती. 20 वर्षीय यशश्री शिंदे नावाच्या तरुणीची हत्या करून अतिशय छिन्नविच्छिन्न अवस्थेत तिचा मृतदेह विटंबना करून टाकून दिल्याचे आढळून आले होते. दोन दिवसांपूर्वी पोलिसांना मुख्य आरोपी दाऊद शेख याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्या चौकशीतून आणि पोलिसांच्या तपासातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. अशातच आता यशश्रीच्या शरीरावर दोन टॅटू असून या टॅटू मधून अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती येऊ शकतात.

उरण शहरात राहणारी यशश्री शिंदे ही 20 वर्षीय तरुणी दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. तिचा शोध सुरू असतानाच यशश्रीचा मृतदेह काल कोटनाका पेट्रोल पंपाजवळ आढळून आला. यशश्री च्या चेहऱ्याचा अक्षरशः चेंदामेंदा करण्यात आला होता. प्रायव्हेट बॉडी पार्ट वर जखमा आढळल्या. तिच्या शवविच्छेदनाच्या रिपोर्ट मधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिच्या गुप्तांगांवर देखील अनेक जखमा आढळून आल्या. यशश्री च्या मृतदेहाला भटक्या प्राण्यांनी अनेक ठिकाणी चावा घेतल्याचे उघड झाले आहे. भटक्या प्राण्यांनी घेतलेल्या चाव्यामुळेच तिचा चेहरा विद्रूप झाला होता. या प्राण्यांनी तिच्या शरीराचे लचके तोडून मास खाल्ले आहे. तर कमरेवर आणि पाठीवर असलेल्या जखमा या चाकूच्या आहेत. त्याचबरोबर यशश्रीवर हत्या करण्याआधी बलात्कार झालेला नाही आणि प्रथमदर्शी ही हत्या एकाच व्यक्तीने केल्याचे शवविच्छेदनातून समोर आले आहे.‌ या त्यामुळे हे प्रकरण समोर येताच नवी मुंबईत संतप्त वातावरण झाले होते. या गुन्ह्याचा तपास पोलीस सर्व बाजूंनी करत आहेत. याच तपासातून त्यांना यशश्रीच्या टॅटू बद्दलची माहिती मिळाली.

यशश्रीच्या शरीरावरील टॅटू आणि यशश्रीचे हत्ये मागे लव्ह ट्रँगल हे कारण आहे का याची चर्चा सध्या सुरू आहे, याबाबतीत पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी माहिती दिली. ‘यशश्री शिंदेच्या हत्या प्रकरणाच्या लव्ह ट्रँगल होता की नाही हे आत्ताच सांगता येणार नाही. पण आरोपी दाऊद शेख याने यशश्री च्या मागे लग्नासाठी तगादा लावला होता. यशस्वी च्या शरीरावर दोन टॅटू आहेत. दोन पैकी एक टॅटू दाऊदच्या नावाचा होता ही बाब पोलीस रेकॉर्डवर आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात दाऊदच्या समोरच यशश्रीने शरीरावर हा टॅटू गोंदवून घेतला होता, अशी माहिती मिळतेय. मात्र यशश्रीने स्वखुशीने, स्वतःहून हा टॅटू गोंदवला होता की, दाऊदने जबरदस्तीने हा टॅटू गोंदवायला भाग पाडले होते? हा टॅटू कोठे काढला ? कोणी काढला? शिवाय दुसरा टॅटू कोणाचा? याचा तपास केला जात आहे’, अशी माहिती काळे यांनी दिली.

पुढे पोलीस उपायुक्त अमित काळे असेही म्हणाले, ‘लव्ह ट्रँगल बद्दल माहिती मिळत नाहीये. दाऊद आणि मौसिन यांची मैत्री चांगली होती. यशश्री आणि दाऊदचे भांडण झालं किंवा त्यांनी एकमेकांना ब्लॉक केलं तर दाऊद मौसिनच्या फोनवरुन यशश्रीला संपर्क करायचा. मात्र लव्ह ट्रँगलचा काही अँगल समोर आलेला नाही.’

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!