Nanded News

Nanded News : खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या मित्रांचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू

1164 0

नांदेड : नांदेडमध्ये (Nanded News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Nanded News) रात्रीच्या वेळी खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांवर काळाने घाला घातला आहे. शेतातील विद्युत तारेला शॉक लागल्याने दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांच्याबरोबर असणारे बाकी दोघेजण जखमी झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील सकनूर गावात सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके?
संभाजी नागरवाड आणि शिवाजी सुरुमवाड अशी मृत तरुणाची नावे आहेत. काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. अशातच मुखेड तालुक्यातील सकनूर येथील रहिवासी असलेले संभाजी पुंडलिक नागरवाड (वय 21 ), शिवाजी रामदास सुरुमवाड (वय 20), संजय मारुती नगरवाड (वय 22) आणि विजय संभाजी हंबीरे (वय 22) हे चौघेजण खेकडे पकडण्यासाठी गावातील ओढ्याकडे जात होते. यादरम्यान एका शेतातून जात असताना शेतातील विद्युत तारेच्या कुंपणाला त्यांचा स्पर्श झाला.

हा झटका एवढा जोरदार होता कि, संभाजी नागरवाड आणि शिवाजी सुरुमवाड यांचा जागीच मृत्यू झाला. तर संजय मारुती नगरवाड आणि विजय संभाजी हंबीरे हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. शॉक लागल्यानंतर जखमी युवक दूर फेकले गेले होते. त्यांना विद्युत तार न दिसल्याने ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे.या घटनेची माहिती मिळताच गावात एकच खळबळ उडाली. या अपघातातील जखमींना तातडीने मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!