Viral Video

Viral Video : एका बॉयफ्रेंडसाठी कॉलेजच्या 2 तरुणींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

3576 0

सध्या कॉलेजच्या तरुण – तरुणींचे अनेक व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. वेगवेगळ्या कारणामुळे नेहमीच मुलांमध्ये असो किंवा मुलींमध्ये वाद होत असतात आणि त्याचं रूपांतर हाणामारीमध्ये होत. सध्या अश्याच एका हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेश येथील इंजिनीअर कॉलेजमधील आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दोन तरुणींमध्ये जोरदार भांडण सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. या मुली एकमेकींचे केस ओढत आहे, तर दुसरी लाथा घालतेय. तर कुणी तिला खाली पाडण्याचा प्रयत्न सुद्धा करतांना दिसून येतंय. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही लोकांनी या भांडणाचा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. विशेष म्हणजे या मुली चक्क कॉलेजमध्ये भांडत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या तरुणी एका बॉयफ्रेंडसाठी भांडत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे.

Share This News
error: Content is protected !!