Buldhana News

Buldhana Accident: बुलढाण्यात भीषण अपघात ! साखरझोपेत असताना 5 जणांना चिरडले

1151 0

बुलढाणा : रोजगाराच्या शोधात मेळघाटातून बुलढाणा (Buldhana Accident) येथे गेलेल्या आदिवासी मजुरांना आज पहाटेच्या सुमारास भरधाव ट्रकने चिरडले आहे. बुलढाणा तालुक्यातील नांदुरा ते मलकापूर रस्त्यावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके?
चिखलदरा तालुक्यातील मोरगाव येथील दहा मजूर रोजगाराच्या शोधात भटकंती करत नांदुरा येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात रुजू झाले. महामार्गालगत झोपडीत झोपले असताना आज पहाटेच्या सुमारास PB-11/CZ 4047 हा आयशर ट्रक वडनेर भोजली एन एच सिक्स गावाजवळ मजुरांच्या झोपडीत शिरला. या घटनेत 26 वर्षीय तरुण प्रकाश बाबू जांभेकर व पंकज तुळशीराम जांभेकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर 18 वर्षीय युवक अभिषेक रमेश जांभेकर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर राजा जादू जांभेकर व 25 वर्षीय दीपक खोजी बेलसरे हे जखमी झाले असून त्यांच्यावर मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Share This News
error: Content is protected !!