Tripura Rath Fire Video

Tripura Rath Fire Video: धक्कादायक ! जगन्नाथ रथाला लागलेल्या आगीत 2 चिमुकल्यांसह 6 जणांचा होरपळून मृत्यू

753 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – त्रिपुरातील उनाकोटी जिल्ह्यात विद्युत तारांच्या संपर्कात आल्यामुळे एका रथाला (Tripura Rath Fire Video) आग लागली. या भीषण आगीमध्ये 2 चिमुकल्यांसह 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर 15 जण जखमी झाले आहेत. भगवान जगन्नाथाच्या ‘उलटा रथयात्रा’ उत्सवादरम्यान (Tripura Rath Fire Video) कुमारघाट परिसरात सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

Pune Police News : सदाशिव पेठमध्ये तरुणीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलीस हवालदारासह 3 जण निलंबित

काय घडले नेमके?
उत्सवादरम्यान मोठ्या संख्येने लोक ‘रथ’ ओढत होते. हा रथ लोखंडाचा होता. मिरवणुकीदरम्यान ‘रथ’ चुकून 133kv ओव्हरहेड केबलच्या संपर्कात आला आणि त्याला आग लागली अशी माहिती सहाय्यक महानिरीक्षक ज्योतिषमान दास चौधरी यांनी दिली आहे. ते म्हणाले कि, या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये २ लहान मुलांचा समावेश आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर नाव वापरणार नाही’;राज्य सरकारने मुंबई हायकोर्टाला दिली हमी

या प्रकरणी त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी मृतांबद्दल शोक (Tripura Rath Fire Video) व्यक्त केला आहे.”कुमारघाट येथे झालेल्या एका भीषण अपघातात, ‘उलटा रथ’ काढत असताना विजेच्या धक्क्याने अनेक यात्रेकरूंना प्राण गमवावे लागले आणि अनेक जण जखमी झाले. या घटनेने मला खूप दु:ख झाले आहे. शोकाकुल परिवाराप्रती संवेदना. तसेच, मी जखमींना लवकरात लवकर बरे होवो ही सदिच्छा. या कठीण काळात राज्य सरकार त्यांच्या पाठीशी उभे आहे.” असे त्यांनी ट्विट केले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!