Travels on Fire

Travels on Fire : हज यात्रेला निघालेल्या ट्रॅव्हल्सला तासवडे टोलनाक्याजवळ लागली भीषण आग

578 0

सातारा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर (Travels on Fire) मिरजहून- मुंबईकडे प्रवासी घेऊन निघालेल्या ट्रॅव्हल्सला अचानक आग लागली. या भीषण आगीमध्ये संपूर्ण ट्रॅव्हल्स जळून खाक झाली आहे. तासवडे टोलनाका (ता. कराड) या ठिकाणी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास या ट्रॅव्हल्सला भीषण आग लागली. या आगीमध्ये 40 प्रवाशी प्रवास करत होते. हे सगळे प्रवासी हज यात्रेला जाण्यासाठी प्रवास करत होते. या घटनेमुळे टोलनाका परिसरात लोकांची चांगलीच धावपळ उडाली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

काय घडले नेमके?
डाॅल्फीन कंपनीची खासगी प्रवासी वाहतूक बस (क्रमांक- एम.एच. 03-सी.पी. 4500) ही रात्री प्रवासी घेऊन मिरजहून- मुंबईकडे निघाली होती. यावेळी कराड येथे ट्रॅव्हल्सया टायर पंक्चर झाल्याने तिथे थांबली होती, तेथून पुढे काही अंतर गेल्यावर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास तासवडे टोलनाक्यानजीक आल्यानंतर या बसला पाठीमागील बाजूस आग लागली. ही बाब पाठीमागून येणाऱ्या वाहनधारकांनी बस चालकाच्या लक्षात आणून दिली.

यानंतर बसचालकाने तातडीने बस थांबवून बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवले. या आगीची माहिती कराड नगरपालिकेच्या अग्निशामक विभागाला देण्यात आल्यानंतर काही वेळात अग्निशामक दलाच्या गाडया घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामक दलाने अवघ्या पाऊण तासात आगीवर नियंत्रण मिळवले यामुळे मोठी दुर्घटना टळली. यावेळी तळबीड पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल योगेश भोसले, प्रविण गायकवाड, होमगार्ड खडके, आकाश माने घटनास्थळी उपस्थित होते. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र ट्रॅव्हल्सचे मोठे नुकसान झाले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

RBI : महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई; परवाना केला रद्द

Pune Accident : पुण्यात स्कुल बसचा भीषण अपघात; CCTV फुटेज आले समोर

Cyclone Michaung : महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस पडणार मुसळधार पाऊस

Crime News : छ. संभाजीनगर हादरलं ! ‘या’ शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची हत्या

Hanjala Adnan : लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी हंजला अदनानची अज्ञाताकडून हत्या

Nanded Accident News : धक्कादायक ! जरांगेंच्या सभेच्या स्वयंसेवकांची यादी घेऊन निघालेल्या युवकाचा अपघाती मृत्यू

Pune Crime : पुणे हादरलं ! प्रेमविवाह करणे तरुणीला पडले महागात; लग्नाच्या 6 महिन्यानंतर तरुणीची आत्महत्या

Skin Care: तुमच्या कपाळाच्या काळेपणामुळे हैराण आहात? तर ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!