Pune News

Pune News : धक्कादायक ! भीमा नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

1046 0

पुणे : पुण्याच्या दौंडमधून (Pune News) मोठी बातमी समोर आली आहे. भीमा नदीत पोहायला गेलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. तालुक्यातील हातवळण या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार हातवळण परिसरात असलेल्या भीमा नदीत सहा मुलं पोहायला गेली होती, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यापैकी तीन जण हि नदीत बुडाली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, स्थानिक नागरिक आणि मच्छिमारांच्या मदतीनं शोधमोहीम राबवून त्या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बुडून मृत्यू झालेले तीनही मुलं हे परराज्यातील असल्याची माहिती समोर येत आहे. ते हातवळण परिसरात असलेल्या उसाच्या गुऱ्हाळावर कामासाठी आले होते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!