Satara Accident

Satara Accident : पुणे बंगळुर हायवेवर भीषण अपघात; सख्ख्या भाऊ-बहिणीसह भाच्याचा मृत्यू

3063 0

सातारा : सातारा (Satara Accident) जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये पुणे-बेंगलोर महामार्गावर पाचवड फाटा तालुका कराड या ठिकाणी एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये वॅगेनार कारने उभ्या असलेल्या आयशर ट्रकला पाठीमागून धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये बहिण, भाऊ आणि भाचा जागीच ठार झाले आहेत.

मृतांतील तिघेही कोल्हापूर जिल्ह्यातील असून भाऊ नितीन पोवार हे कोल्हापूर येथील पोलीस कर्मचारी आहेत. मनीषा आप्पासाहेब जाधव आणि नितीन बापूसाहेब पोवार (रा. कोल्हापूर राजवाडा) आणि अभिषेक आप्पासाहेब जाधव अशी या अपघातात मृत पावलेल्या तिघांची नावे आहेत. या घटनेमुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

Share This News
error: Content is protected !!