Buldhana News

Buldhana News : बुलढाणा हळहळलं ! महिलेची चिमुकल्यासह विहिरीत उडी; तरुण मदतीला धावला मात्र…

606 0

बुलढाणा : अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. यादरम्यान बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातील भरोसा या गावात एक मोठी दुर्दैवी घटना समोर आली आहे. यामध्ये एका महिलेने आपल्या अवघ्या 21 महिन्यांच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या मायलेकांना वाचविण्यासाठी विहिरीत उडी मारलेल्या तरूणाचाही गाळात फसल्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय घडले नेमके?
भरोसा येथील विवाहिता शितल गणेश थुट्टे हिने अवघ्या 21 महिन्यांचा देवांश या चिमुकल्यासह गावातील शेतकरी दिनकर जाधव यांच्या मालकीच्या विहिरीत 6 नोव्हेंबरच्या सायंकाळी 5 ते 6 वाजेच्या सुमारास उडी घेऊन आत्महत्या केली. शितल हिने चिमुकल्यासह विहिरीत उडी घेतल्याचे समजताच त्यांच्या वाचविण्यासाठी गावातील सिध्दार्थ निंबाजी शिरसाठ (36) यांनी विहिरीत उडी घेतली. मात्र सिध्दार्थ यांचे पाय गाळात फसल्याने त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

माहिती मिळताच अंढेरा पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. रात्रीचा अंधार आणि विहिरीत गाळ असल्याने मृतदेह काढणे जिकरीचे ठरले होते. 7 नोव्हेंबरच्या पहाटे हे तीनही मृतदेह बाहेर काढल्यानंतर तिघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. दुपारी भरोसा येथेही तीनही मृतदेहांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शितल यांनी टोकाचे टाकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप समजू शकलेले नाही. मृत शितल आणि निष्पाप चिमुकला देवांश यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Share This News
error: Content is protected !!