क्राईमठळक बातम्या

#ACCIDENT : ट्रकची शाळकरी मुलांच्या ऑटोला जबर धडक ; चार मुलांचा मृत्यू, रिक्षा चालकासह ७ मुलं गंभीर जखमी

छत्तीसगड : छत्तीसगड मधील कांकेर येथे गुरुवारी दुपारी एका भीषण अपघातामध्ये बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एका ट्रकने शाळकरी मुलांच्या ऑटोला जबर धडक दिली. या धडकेमध्ये चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर सहा मुलं आणि रिक्षाचालक बाल-बाल बचावले आहे. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, गुरुवारी छत्तीसगड मधील कांकेर येथे हा अपघात झाला. ट्रकने ऑटोला जबर धडक दिली होती. या ऑटोमध्ये बारा मुलं घरी परतत होती. अशी माहिती समजते आहे. यात रुद्रदेव (वय वर्ष ७), रुद्राक्षी (वय वर्षे ६), इंसान मांडवी (वय वर्ष ४) आणि मानव साहू (वय वर्ष ६) या चार मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. आणि ऑटो चालकासह सात मुलं गंभीर जखमी झाले आहेत.