Nashik News

Nashik News : खळबळजनक ! रस्त्याजवळच गोणीत आढळला महिलेचा मृतदेह; हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना येणार यश?

617 0

नाशिक : नाशिक (Nashik News) शहरातील म्हसरूळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या दिंडोरी रोडवरील आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळ एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये एका गोणीत कुजलेल्या अवस्थेत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाची ओळख पटली असली तरी देखील या महिलेच्या हत्येमागील गूढ कायम आहे. सुलोचना पवार असे त्या मृत महिलेचे नाव आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
गेल्या मंगळवारी (ता. 26) दिंडोरी रस्त्यावर ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी येत होती. त्यांनतर नागरिकांना संशय आल्याने त्यांनी याबाबतची माहिती मसूर पोलिसांना कळवली. पोलिसांचं पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं.त्यानंतर घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबच्या पथकालाही पाचारण करण्यात आले होते. यानंतर पोलिसांनी तो मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

त्याच्या अहवालानुसार महिलेचा गळा दाबून खून झाल्याचे स्पष्ट झाले. या मृतदेहाजवळ पिशवीत कपडे व भांडी होती. यासह मृतदेहाच्या गळ्यात एक पिवळ्या धातूच्या मण्यांचे मंगळसूत्र व कानात जोड आढळून आले होते. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत महिलेची आई, भाऊ आणि मुलगा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या नातलगांनी मृतदेह ओळखून तिचे नाव सुलोचना असल्याचे सांगितले. हे सर्वजण दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील रहिवाशी आहेत.

या महिलेच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेची यापूर्वीच दोन लग्ने झाली आहेत. दोन्ही नवऱ्यांनी तिच्याशी वैवाहिक संबंध तोडलेले आहेत. ती काहीशी वेडसर वागायची आणि सतत घर सोडून जायची असे सांगितले. आता तिचा मृतदेह आढळून आल्याने अनेक उलट सुलट चर्चा रंगू लागल्या होत्या. या महिलेचा खून नेमका कोणी केला? आणि कोणत्या कारणासाठी केला? याचा तपास नाशिक पोलीस करत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!