आईने मुलीला प्रियकरासह ‘त्या’ अवस्थेत पाहिलं अन् दोघांनी आईलाच संपवलं
प्रेम प्रकरणातून एका मुलीने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना खालापूर तालुक्यात घडली. संगीता मारुती झोरे असं मयत आईचं नाव आहे.
संगीता यांना दोन मुली आहेत. ते आपल्या मुलींसह परखंदे अहिल्यानगर या गावात राहत होत्या. सोमवारी रात्री त्या नेहमीप्रमाणे मुलींसह घरामध्ये झोपत्या. पहाटे संगीता यांना अचानक जाग आल्याने त्या उठल्या. त्यावेळी त्यांनी मोठी मुलगी भारती झोरे हिला प्रियकराबरोबर नको त्या अवस्थेत पाहिलं व आरडाओरडा सुरू केला. त्यावेळी घाबरलेल्या मुलीने आणि तिच्या प्रियकराने संगीता यांचं तोंड दाबून त्यांना जमिनीवर पाडले. संगीता यांनी आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचवेळी आरोपी मुलीच्या प्रियकराने घरातील मोठं ब्लॅंकेट त्यांच्या तोंडावर टाकून तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. तर मुलीने संगीता यांचे पाय पकडून ठेवले. काही वेळातच श्वास कोंडल्याने संगीता यांचा मृत्यू झाला.
त्यानंतर संगीता यांची हत्या झाल्याचे लपवण्यासाठी मुलीने व तिच्या प्रियकराने घराच्या छताला साडी बांधून त्यावर त्यांचा मृतदेह लटकावला. हत्येला आत्महत्या बसवण्याचा बनाव केला. मात्र हे सगळं घडत असताना संगीता यांची लहान मुलगी तिथेच होती. तिने हा सगळा प्रकार पाहिला आणि नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर नातेवाईकांनी थेट खालापूर पोलीस ठाणं गाठून आरोपी मुलगी आणि तिच्या प्रियकरा विरोधात फिर्याद दिली.
त्यानुसार खालापूर पोलीस ठाण्यात मुलगी भारती झोरे आणि तिचा प्रियकर संतोष नांदगावकरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.